जखमी घुबडाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:53 IST2019-01-12T00:52:59+5:302019-01-12T00:53:20+5:30
धागूर येथील युवकाने जखमी घुबड पक्ष्यावर उपचार करून जीवदान दिले. धागूर येथील एका झाडावर बसलेल्या घुबड पक्षास कावळ्यांनी हल्ला चढवून अत्यंत जखमी केले होते.

जखमी घुबडाला जीवदान
मातोरी : धागूर येथील युवकाने जखमी घुबड पक्ष्यावर उपचार करून जीवदान दिले. धागूर येथील एका झाडावर बसलेल्या घुबड पक्षास कावळ्यांनी हल्ला चढवून अत्यंत जखमी केले होते. त्यात त्याच्या डोळ्यास दुखापत झाल्याने तो वेदनेने तळमळत असताना गावातील नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु सामाजिक कार्यकर्ते व फिल्म दिग्दर्शक म्हणून नव्याने ओळख असलेल्या विजय घोटे या तरुणाने जखमी घुबडास पकडून पाणी पाजले व कावळ्यांपासून त्याची सुटका केली. जखमी अवस्थेत घुबडास नाशिक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून योग्य ते उपचार केले व त्याची प्रकृती सुधारताच रात्रीच्या वेळी मोकळ्या हवेत सोडून दिले.