थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 15:29 IST2023-08-01T15:27:57+5:302023-08-01T15:29:12+5:30

भीषण अपघातात १७ ठार, ३ गंभीर जखमी : आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती

Live from the scene...Girder with giant crane collapsed from 110 feet in shahapur mishap incident | थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

थेट घटनास्थळावरुन... ११० फूट उंचावरून कोसळली महाकाय क्रेनसह गर्डर

पुरूषोत्तम राठोड 

थेट घटनास्थळावरून...

घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक : सरळांबे - शहापूर (जि. ठाणे) - हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर होणाऱ्या विविध अपघातांच्या शृंखला कानावर येत असतांनाच समृद्धी महामार्गाच्या १६ नंबर पॅकेजमध्ये दि ३१ रोजी सरळांबे येथे रात्री ११ वाजता ब्रिजचे गर्डरवर चढवत असतांना भली मोठी क्रेन लॉन्चर कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ कामगार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. त्यामधील काम करणारे तीन कामगार गायब असून त्यांचा शोध सुरू आहे. सुदैवाने यामधील पाच जण सुखरूप वाचले आहेत. या ठिकाणी एकूण २७ कामगार काम करत असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले असले तरी स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या मते आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविले जात आहे.
मलब्यात अडकलेल्या तीन कामगारांना काढण्यासाठी एनडीआरएफची टीम सेगमेंट लॉन्चर हटवण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नागपूर पासून कवडदरा पर्यंत महामार्ग सुरू झाला असून मुंबईला जोडणाऱ्या शेवटच्या शहापूरच्या १६ नंबरचे शेवटचे पॅकेज काम नवयुगा कंपनीकडे आहे. या कंपनीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी असल्याने समृद्धी मार्ग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कमी वेळात जास्त काम करण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू होते. काल दि ३१ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान बॅलेन्स कॅन्टीलिव्हर ब्रिज सेगमेंट लोंचिंग काम सुरू होते. ११० फूट उंच पिलरवर 'गर्डर' वर दोन्ही पिलरवर चढवायचे काम सुरू असतांना. लॉंचिंग क्रेनला तोल सांभाळल्या न गेल्याने गर्डरसह भली मोठी क्रेन खाली ढासळल्याने अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठी जीवितहानी झाली असली तरी या संपूर्ण ढासळलेल्या क्रेनसह मलब्याला अजून दहा तास लागण्याची शक्यता एनडिआरएफच्या काम करणाऱ्या जवानांनी सांगितले. समृद्धीच्या पूल बांधकामावर अपघातात गंभीर जखमीं झालेल्या तीन कामगारांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे. झालेल्या अपघाताची तीव्रता बघता यामधील उर्वरित कामगार कुणीही वाचले नसल्याने प्रथमदर्शनी दिसत आहे.

अपघातस्थळी अडकलेल्या कामगारांना काढण्यासाठी स्थानिक कंपनी कामगारांच्या मदतीने एनडीआरएफची टीम रात्री दोन वाजेपासून कोसळलेल्या क्रेनसह मलबा हटवण्याचा प्रयत्न करीत असून यामधील तीन कामगार अडकले असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून बोलल्या जात असले तरी आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

घटनास्थळी भेटी

घटनास्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, ठाण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक आमदार दौलत दरोडा, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी भेटी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री घेणार भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी अपघातस्थळी भेट देणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळविले जात असून, जखमींची ठाण्यातील रुग्णालयात भेट घेणार असून त्यानंतर सरंबाळे येथील अपघात ठिकाणी पाहणी करणार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
 

Web Title: Live from the scene...Girder with giant crane collapsed from 110 feet in shahapur mishap incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.