शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

वातावरणात गारवा : ढगाळ हवामानासह हलक्या सरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 19:40 IST

रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला.

ठळक मुद्देशहरासह उपनगरांमध्ये अधुनमधून वर्षावशहरात वा-याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे

नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे पावसाच्या हलक्या सरी सुमारे अर्धा तास कोसळल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वा-याचा वेग वाढला असून दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पाऊस या पुढील दोन दिवसांत जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातदेखील वा-याचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.

रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सुर्यप्रकाश गायब राहिला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाने काही भागात हजेरी लावली. मात्र, पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुर्यास्तापर्यंत शहरात पहावयास मिळाला. दरम्यान, पहाटे १.२ मिलीमीटर, तर सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत केवळ ०.६ मिलीमीटर पाऊस पेठरोडवरील हवामान निरिक्षक केंद्राकडून नोंदविला गेला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरासह वडाळा, इंदिरानगर, जुनेनाशिक, द्वारका, उपनगर, आंबेडकरनगर या भागात दमदार सरींचा वर्षाव झाला मात्र वारा सुुटल्यामुळे सरी अल्पवेळच टिकू शकल्या. रविवारची सुटी आणि संध्याकाळनंतर संचारबंदी व जमावबंदी आदेशाची केली जाणारी काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळे रस्त्यांवर फारशी वर्दळ पहावयास मिळाली नाही. रविवारची सुटी नाशिककरांनी आपआपल्या घरांमध्येच साजरी केली. एरवी पावसाळ्यात नाशिककर आठवडाभराचा क्षीण घालविण्यासाठक्ष त्र्यंबकेश्वर, गंगापूर, इगतपुरी या भागात पावसाळ्यात भटकंतीला पसंती देतात; मात्र यंदा कोरोनामुळे नागरिकांना वर्षा सहलीवर पाणी सोडावे लागत आहे, यामुळे काहीसा हिरमोडही अनेकांचा झाला.- -

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाweatherहवामानRainपाऊस