औंदाणे येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 20:04 IST2019-07-22T20:03:20+5:302019-07-22T20:04:12+5:30
औंदाणे : यशवंतनगर औंदाणे (ता. बागलाण) येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात मंगलमय वातावरणात करण्यात आली.

यशंवतनगर औदाणे- येथील श्री हनुमान मंदिर.
ठळक मुद्देग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून श्री हनुमानाची मूर्ती आणली
औंदाणे : यशवंतनगर औंदाणे (ता. बागलाण) येथे लोकसहभागातून श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात मंगलमय वातावरणात करण्यात आली.
येथे जागृत देवस्थान असलेले पुरातन हनुमान मंदिर आहे. ग्रामस्थांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून श्री हनुमानाची मूर्ती आणली व ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी यशवंतराव महाराज मंदिर ते गावातुन ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काडण्यात आली. यावेळी मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोहळ्यादरम्यान मुर्तीची महापुजा करण्यात आली. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी गावातील महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.