खरवंडी येथे पाडसाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 01:14 IST2021-03-30T01:14:27+5:302021-03-30T01:14:53+5:30

येवला तालुक्यातील खरवंडी गावाजवळ हरणाच्या पाडसाची श्वानाच्या तावडीतून सुटका करून वाटसरूंनी त्यास जीवदान दिले.

Life saving for Padsa at Kharwandi | खरवंडी येथे पाडसाला जीवदान

खरवंडी येथे पाडसाला जीवदान

येवला : तालुक्यातील खरवंडी गावाजवळ हरणाच्या पाडसाची श्वानाच्या तावडीतून सुटका करून वाटसरूंनी त्यास जीवदान दिले.
भारम येथून योगेश गोराणे आणि सहकारी कामानिमित्त नांदगाव येथे जात आसताना त्यांना खरवंडी ते भारम रोडलगत एक  श्‍वान हरणाचे पाडस तोंडात धरून चालले असताना दिसले.  गोराणे यांनी आपला ट्रक थांबवून श्‍वानाचा पाठलाग केला आणि त्याच्या तावडीतून पाडसाची सुटका केली. 
पाडसाला काही ठिकाणी जखमाही झाल्या होत्या. त्यांनी  सदर घटनेची माहिती ममदापूर राखीव काळवीट वन्यजीव संवर्धन पथकाचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवली. वन कर्मचारी दत्तू गोसावी यांच्या ताब्यात पाडसाला देण्यात आले. 

Web Title: Life saving for Padsa at Kharwandi