कोरोनाविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याखानातून धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:25 IST2020-06-14T13:25:04+5:302020-06-14T13:25:58+5:30
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरोनाशी लढण्याचे धडे दिले जात आहेत.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याखानातून धडे
नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. या शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असून, या ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरोनाशी लढण्याचे धडे दिले जात आहेत.
नाशिप्रच्या या ऑनलाइन व्याख्यानातून कोरोनाविषयी समुपदेशन व मार्गदर्शानाच्या उपक्रमात कोरोनावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयुष मंत्रालयाने सुचविलेली औषधे घ्यावीत व प्रतिकारशक्ती वाढीसाठी प्राणायम, सूर्यनमस्कारसारखी योगासने करण्याचे आवाहन नाशिप्र मंडळांचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी केले. कोरोनाविरोधात यात लढताना विद्यार्थ्यांना द्यावयाचे धडे या विषयावर संस्थेचे पदाधिकारी, शाळांचे पदाधिकारी यांच्याशी गुगल मिट वरून ऑनलाइन कोरोनावर मात करण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना काय माहिती दिली पाहिजे. याबाबत संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे महत्त्व, मास्कचे स्वरूप, सतत हात धुण्याची प्रक्रिया, फिजिकल डिस्टन्स, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेले औषधे, काढा व होमिओपॅथिक गोळ्या घेण्याविषयी या व्याख्यानांमधून मार्गदर्शन करण्यात येत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, सचिव अश्विनीकुमार येवला यांनीही विविध शाळांचे विद्यार्थ्यांसोबतच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थांनी घरातील कामांना मदत करतानाच बुद्धिबळ, कॅरमसारखे खेळणे, पाढे, उजळणी, इंग्रजी डिक्शनरीतून शब्दांचा अभ्यास करण्यासोबत वाचन वाढविण्याचा आणि म्हणी व सुविचारांचे अर्थ समजून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा, विविध कला, भाषा शिकण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून दिला जात आहे.