कावनई-रायबे येथील वनक्षेत्रालगत वाहनाच्या धडकेमुळे मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:27 IST2020-08-01T16:26:44+5:302020-08-01T16:27:11+5:30
वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कावनई-रायबे येथील वनक्षेत्रालगत वाहनाच्या धडकेमुळे मृत बिबट्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
वन परिमंडळ अधीकारी डी. एस. ढोंनर यांनी वनरक्षक राहुल घटेसाव यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली. इगतपुरी वनपरीक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, पोलीस पाटील धांडे, पशुवैद्यकीय अधिकारी, घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
एक वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत होते. वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला.
शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर बिटाअंतर्गत असलेल्या वनक्षेत्रात त्याचे दहन करण्यात आले.