नानेगाव रोडवर बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:13 IST2021-04-13T04:13:37+5:302021-04-13T04:13:37+5:30

देवळालीच्या देवी मंदिर परिसरातील सेंट्रल स्कूल ते फरजदी बागेपर्यंतचा नानेगाव रोड हा बिबट्याच्या व्यस्तव्याचा परिसर बनला आहे. याच ठिकाणी ...

Leopard swarms on Nanegaon Road | नानेगाव रोडवर बिबट्याचा धुमाकूळ

नानेगाव रोडवर बिबट्याचा धुमाकूळ

देवळालीच्या देवी मंदिर परिसरातील सेंट्रल स्कूल ते फरजदी बागेपर्यंतचा नानेगाव रोड हा बिबट्याच्या व्यस्तव्याचा परिसर बनला आहे. याच ठिकाणी संपतराव कासार यांचे रामबाग हे फार्महाउस आहे. येथील त्यांचे म्हशीचे गोठ्यातील पारडू आठ दिवसांपूर्वी बिबट्याने फाडून टाकले. तदनंतर याच मळ्यातील कुत्रे व त्यांची पिल्ले यांनाही भक्ष केले. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याने कासार यांच्या गाईचे वासराचा बळी घेतला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून, सकाळी कासार यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता, वनरक्षक गोविंद पंढरे, डी.पी. काळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे बघून ती बिबट्याचीच असल्याचे सांगितले. त्यानुसार या ठिकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Leopard swarms on Nanegaon Road