भरवस्तीत बिबट्याचा चार तास धुमाकूळ; सात जणांवर हल्ले; बेशुद्ध केल्यानंतर बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:25 IST2025-11-15T08:25:33+5:302025-11-15T08:25:51+5:30
Leopard Attack: बिबट्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील संत कबीरनगरसह महात्मानगर परिसरात बिबट्याने तब्बल चार तास धुमाकूळ घालत दोन कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांना जखमी केले.

भरवस्तीत बिबट्याचा चार तास धुमाकूळ; सात जणांवर हल्ले; बेशुद्ध केल्यानंतर बिबट्या जेरबंद
नाशिक - बिबट्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील संत कबीरनगरसह महात्मानगर परिसरात बिबट्याने तब्बल चार तास धुमाकूळ घालत दोन कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांना जखमी केले. अखेर साडेपाच वाजेच्या सुमारास बंदुकीच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
झाडाझुडपांतून नागरी वस्तीत प्रवेश
सातपूर परिसरातील कॅनाल रेडच्या झाडाझुडपांतून नागरी वस्तीत प्रवेश करीत एका महिलेवर हल्ला करीत तिला जखमी केले.
संत कबीरनगर परिसरात तिघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या वनविहार कॉलनीकडे पळाला. या उच्चभ्रू परिसरात प्रथम एका दुकानाच्या मागील बाजूस आश्रय घेणाऱ्या बिबट्याने नंतर बेकरी आणि दोन बंगल्यांसह मोठ्या सोसायटीत तब्बल तीन तास धुमाकूळ घातला.
यादरम्यान वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाच नागरिकांना त्याने जखमी केले. अखेर बंदुकीच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन देण्यात आल्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला