शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या अन् वाघाची मावशी पडली विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

नांदूरशिंगोटे - वावी रस्त्यालगत कणकोरी शिवारात सदरची घटना घडली. सुरेगाव चौफुलीजवळ वाळिबा पुंजा सांगळे यांची शेतजमीन व विहिर आहेत. ...

नांदूरशिंगोटे - वावी रस्त्यालगत कणकोरी शिवारात सदरची घटना घडली. सुरेगाव चौफुलीजवळ वाळिबा पुंजा सांगळे यांची शेतजमीन व विहिर आहेत. रविवारी (दि.५) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वस्तीवर राहणारे सुकदेव बुचकुल हे विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येत होता. विहिरीच्या कपारीला बिबट्या बसलेला होता. बुचकुल यांनी शेतमालक गणेश सांगळे व माजी उपसरपंच रामनाथ सांगळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर सांगळे यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, सुधीर बोकडे आदींंसह कर्मचाऱ्याचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विहीर खोल असल्याने बिबट्याला बाहेर काढताना अडचणी लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा आणला. विहिरीचा वरचा भाग मोकळा असल्याने वनविभागाने वावी येथून किरण पाटील यांची हायड्रोलिक क्रेन मागविली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने दुपारी अकरा वाजेच्या सुमारास विहिरीत पिंजरा सोडला. पिंजरा सोडल्यानंतर काही काळ बिबट्या पिंजऱ्यापर्यंत येत होता व परत माघारी जात होता. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची घालमेल होत होती. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि त्याला क्रेनच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या पाच ते साडेपाच वर्षांचा असून नर जातीचा बिबट्या आहे. सिन्नर येथील वन उद्यानात बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

इन्फो

बिबट्या व मांजर दोघेही विहिरीत

विहिरीचा अंदाज न आल्याने व मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या व मांजर हे दोघेही विहिरीत पडले असल्याचा अंदाज असून रात्रभर दोघांचा मुक्काम विहिरीत होता. दोघांनी परस्परविरोधी बाजूला कपारीचा आधार घेतला. दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याला काढल्यानंतर पुन्हा क्रेनद्वारे एका युवकाला विहिरीत पाठवून मांजरालाही वनविभागाने बाहेर काढले.

इन्फो

सांगळे यांची ५० ते ६० फूट विहीर असून त्यामध्ये २८ फुटांपर्यंत पाणी होती. पाण्याच्या वरतीच विहिरीची कपार असल्याने बिबट्या कपारीचा आडोसा घेत होता. २५ फुटापर्यंत विहिरीचे दगडी बांधकाम होते. विहिरीला वरच्या बाजूने कठडा नसल्याने मध्यरात्रीच्या सुमारास अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाचे पंधरा ते वीस कर्मचारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल आठ तासाच्या अथक परिश्रम घेतल्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले.

फोटो - ०५ सिन्नर बिबट्या१/२

सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आले.

050921\05nsk_38_05092021_13.jpg~050921\05nsk_39_05092021_13.jpg

फोटो - ०५ सिन्नर बिबट्या १~फोटो - ०५ सिन्नर बिबट्या २