शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

विधानसभा पथ्यावर, ६७ हजारांची थकबाकी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 12:13 AM

नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या पथ्यावर पडली असून, त्यानिमित्ताने ११२ इच्छुक आणि अन्य उमेदवारांनी ना हरकत दाखल नेला असून, त्या बदल्यात ६७ हजार २०० रुपये वसुली प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्दे शासकीय कराची थकबाकीचे निमित्त करून संबंधित उमेदवारांचा अर्ज बाद होऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या पथ्यावर पडली असून, त्यानिमित्ताने ११२ इच्छुक आणि अन्य उमेदवारांनी ना हरकत दाखल नेला असून, त्या बदल्यात ६७ हजार २०० रुपये वसुली प्राप्त झाली आहे.कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणत्याही प्रकारच्या कराची थकबाकी चालत नाही. शासकीय कराची थकबाकीचे निमित्त करून संबंधित उमेदवारांचा अर्ज बाद होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांची खेळी यशस्वी होऊ नये यासाठी सर्व इच्छुकांनी दरवेळीप्रमाणे महापालिकेत अर्ज केले होते. यात राजकीय नेते आणि नगरसेवकांचा भरणा अधिक होता. विशेषत: यंदा भाजप-सेनेच्या इच्छुक नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार ११२ जणांना महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत नसल्याचे दाखले दिले आहेत. तत्पूर्वी, थकीत कर सर्वांनी भरला असून, त्यासाठी अनेकांनी थकीत करदेखील भरले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीत तब्बल ६७ हजारांची भर पडली आहे. नाशिक पूर्वमधील एक उमेदवाराने तर महापालिकेच्या अभ्यासिका आणि वाचनालयाच्या भाड्यापोटी थकीत असलेले तब्बल २० लाख रुपये महापालिकेच्या खजिन्यात जमा केले आहेत. त्यामुळे महापालिकेची खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे. नाशिकमध्ये केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्याच मिळकती नाहीत तर धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथील राजकीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या मिळकती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी तेथे निवडणूक लढविण्यासाठीदेखील कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अर्ज दाखल केले होते. त्या सर्वांनादेखील थकीत कर भरल्यानंतरच दाखले देण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019