विधानसभा पथ्यावर, ६७ हजारांची थकबाकी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:14 IST2019-10-09T00:13:48+5:302019-10-09T00:14:29+5:30
नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या पथ्यावर पडली असून, त्यानिमित्ताने ११२ इच्छुक आणि अन्य उमेदवारांनी ना हरकत दाखल नेला असून, त्या बदल्यात ६७ हजार २०० रुपये वसुली प्राप्त झाली आहे.

विधानसभा पथ्यावर, ६७ हजारांची थकबाकी वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणूक महापालिकेच्या पथ्यावर पडली असून, त्यानिमित्ताने ११२ इच्छुक आणि अन्य उमेदवारांनी ना हरकत दाखल नेला असून, त्या बदल्यात ६७ हजार २०० रुपये वसुली प्राप्त झाली आहे.
कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणत्याही प्रकारच्या कराची थकबाकी चालत नाही. शासकीय कराची थकबाकीचे निमित्त करून संबंधित उमेदवारांचा अर्ज बाद होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांची खेळी यशस्वी होऊ नये यासाठी सर्व इच्छुकांनी दरवेळीप्रमाणे महापालिकेत अर्ज केले होते. यात राजकीय नेते आणि नगरसेवकांचा भरणा अधिक होता. विशेषत: यंदा भाजप-सेनेच्या इच्छुक नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार ११२ जणांना महापालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत नसल्याचे दाखले दिले आहेत. तत्पूर्वी, थकीत कर सर्वांनी भरला असून, त्यासाठी अनेकांनी थकीत करदेखील भरले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या घरपट्टी आणि पाणीपट्टीत तब्बल ६७ हजारांची भर पडली आहे. नाशिक पूर्वमधील एक उमेदवाराने तर महापालिकेच्या अभ्यासिका आणि वाचनालयाच्या भाड्यापोटी थकीत असलेले तब्बल २० लाख रुपये महापालिकेच्या खजिन्यात जमा केले आहेत. त्यामुळे महापालिकेची खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे. नाशिकमध्ये केवळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्याच मिळकती नाहीत तर धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथील राजकीय नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या मिळकती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी तेथे निवडणूक लढविण्यासाठीदेखील कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अर्ज दाखल केले होते. त्या सर्वांनादेखील थकीत कर भरल्यानंतरच दाखले देण्यात आले आहेत.