राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोल्हापूरला महाअधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 22:54 IST2016-01-22T22:53:00+5:302016-01-22T22:54:30+5:30
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोल्हापूरला महाअधिवेशन

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोल्हापूरला महाअधिवेशन
मालेगाव : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कोल्हापूर येथे बुधवारी (दि. २७) राज्यस्तरीय महाअधिवेशन होत आहे.
उद्घाटन बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून, अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरच्या महापौर आश्विनी रामाणे असणार आहेत,
तर प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगलेचे खासदार राजू शेट्टी, खासदार
धनराज महाडिक, हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, सुरेश हळवणकर, अमल महाडिक, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, संध्यादेवी कुपेकर, सहायक कामगार आयुक्त
सुहास कदम, सत्यजित पाटील, कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, अध्यक्ष हरिश्चंद्र पवार उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी (दि. २६) दुपारी २ वाजता नावनोंदणी व रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान औपचारिक बैठक होणार आहे. बुधवारी (दि. २७) पहाटे ५ वाजता जागरण, दुपारी अडीच ते साडेचार वाजेदरम्यान सर्वसाधारण सभा होऊन सायंकाळी ५ वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
अधिवेशनास मालेगावसह परिसरातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मालेगाव वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)