‘जीएसटीची ओळख’ विषयावर व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:03 IST2018-03-22T23:03:07+5:302018-03-22T23:03:07+5:30
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात जीएसटीची ओळख या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न झाले.

‘जीएसटीची ओळख’ विषयावर व्याख्यान
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात जीएसटीची ओळख या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख व्याख्याते म्हणून सीए सौरभ लुणावत यांचे मागदर्शन लाभले. त्यांनी जीएसटीची संकल्पना मांडली. तसेच जीएसटी वापरात आणताना येणारे अडथळे, उपलब्ध असणारे पर्याय यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे , एमबीएचे विभागप्रमुख डॉ. ए. आर. बोरा आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यार्थिनी पल्लवी पाटील व कल्याणी खैरनार यांनी केले.