दिंडोरीत टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:59 IST2020-09-21T22:53:28+5:302020-09-22T00:59:19+5:30
दिंडोरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक शिवाजी पिंगळ व उपसभापती अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाटा विक्रीसाठी आणला होता.

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ करताना समितीचे संचालक शिवाजी पिंगळे. समवेत उपसभापती अनिल देशमुख आदींसह शेतकरी.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक शिवाजी पिंगळ व उपसभापती अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाटा विक्रीसाठी आणला होता.
टमाट्याला ८५१ रुपये क्रेट याप्रमाणे दर मिळाला. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा टमाटा विक्रीसाठी आणावा, व्यापाºयांनीही शेतकºयांना चांगला दर द्यावा तसेच शेतकºयांना काही अडचणी आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे संचालक गुलाब जाधव, अमित चोरडिया, शिवाजी दातीर, जे. के. जाधव, विलास अपसुंदे, दिलीप सोमवंशी, भास्कर वसाळ, शरद अपसुंदे, विजय धुमाळ, आबा पाटील, सहादू आहेर, नवाब मन्सुरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.