तांदुळवाडी गावात स्वच्छता अन् प्लॅस्टिक बंदी अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 21:40 IST2019-10-02T21:39:42+5:302019-10-02T21:40:47+5:30

ताहाराबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

Launch of sanitation and plastic ban campaign in Rural Village | तांदुळवाडी गावात स्वच्छता अन् प्लॅस्टिक बंदी अभियानाची सुरुवात

तांदुळवाडी गावात स्वच्छता अन् प्लॅस्टिक बंदी अभियानाची सुरुवात

ठळक मुद्देताहाराबाद : वीस प्लॅस्टिक पिशव्यांच्या बदल्यात एक कापडी पिशवी उपक्र म

ताहाराबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
गावातून स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी साठी जनजागृती फेरी काढण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी स्वच्छता व प्लॅस्टिक बंदीची प्रतिज्ञा ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली.
याप्रसंगी सरपंच प्रकाश बोरसे, उपसरपंच समीर भामरे, दीपक ह्याळीज, भास्कर भामरे, वैशाली भामरे, मनोहर भामरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्लॅस्टिक पिशवी ग्रामस्थांसाठी रोज वापराची गरज बनली हा वापर थांबविण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय प्लॅस्टिक पिशवी हद्दपार होणार नाही म्हणून वीस लहान मोठ्या प्लॅस्टिक पिशव्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करा व एक कापडी पिशवी मोफत घेऊन जा हा अभिनव उपक्र म हाती घेण्यात आला आहे अशी माहिती ग्रामसेवक योगेश भामरे यांनी दिली.
 
Web Title: Launch of sanitation and plastic ban campaign in Rural Village