शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण

By admin | Updated: November 14, 2016 01:31 IST

महापालिका : मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा; पहिल्या टप्प्यात ५० घंटागाड्या रस्त्यावर

नाशिक : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते नवीन घंटागाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला आणि पहिल्या टप्प्यात ५० घंटागाड्या रस्त्यावर उतरल्या. गोल्फ क्लब मैदानावर आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, मनसेचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व शहराध्यक्ष राहुल ढिकले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, मनसेचे गटनेते अनिल मटाले, भाजपा गटनेते सतीश कुलकर्णी, रिपाइंचे गटनेते प्रकाश लोंढे, नगरसेवक यशवंत निकुळे, कांचन पाटील आदि उपस्थित होते. यावेळी विनायकदादा पाटील यांनी सांगितले, नाशिक शहराला निसर्गाची उत्तम देणगी लाभलेली आहे. त्यामुळे शहराचे सौंदर्य जपण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून ती सर्व नागरिकांची आहे. नागरिकांनी शहराचे विद्रुपीकरण होणार नाही यादृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे. नवीन घंटागाड्यांमार्फत शहराच्या स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. महापौर अशोक मुर्तडक यांनीही शहर स्वच्छतेत नागरिकांचेही मोठे सहकार्य अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले, तर अविनाश अभ्यंकर यांनी मनसेच्या कामांची चुणूक आता दिसायला लागत असल्याचे सांगितले. स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी नवीन घंटागाड्या रस्त्यावर धावणार असल्याबाबत आनंद व्यक्त करतानाच ठेकेदार व कर्मचाऱ्यांनीही जबाबदारीचे भान राखावे, असे आवाहन केले. प्रारंभी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, सहायक आरोग्याधिकारी सचिन हिरे, डॉ. सुनील बुकाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)