सीबीएसमधून महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:59 IST2018-11-18T16:58:40+5:302018-11-18T16:59:09+5:30
नाशिक : साक्रीला जाण्यासाठी कुटुबीयांसह मध्यवर्ती बसस्थानकात आलेल्या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़

सीबीएसमधून महिलेचे दीड लाखाचे दागिने लंपास
नाशिक : साक्रीला जाण्यासाठी कुटुबीयांसह मध्यवर्ती बसस्थानकात आलेल्या महिलेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़
नवी मुंबई येथील अनिता महाजन (४३, रा़ भिंगारी, पनवेल) या पती बापुराव महाजन व मुलांसमवेत साक्रीला जाण्यासाठी ४ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुने सीबीएसला आल्या होत्या़ या ठिकाणी बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या जवळील चॉकलेटी रंगाचा हॅण्डबॅगमधील एका बॉक्समध्ये ठेवलेले १ लाख १० हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचा नेकलेस असे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़