शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकातील मकराणी बंधूंना सात वर्षांचा कारावास

By admin | Updated: January 8, 2015 00:36 IST

जुन्या नाशकातील मकराणी बंधूंना सात वर्षांचा कारावास

नाशिक : तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न करणे तसेच दरोड्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांनी जुन्या नाशकातील पाच आरोपींना सात वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ २२ एप्रिल २००८ रोजी सारडा सर्कलजवळील एका स्पेअरपार्टच्या दुकानात घुसून आरोपी अर्शद कुतुबुद्दीन मकराणी, अ‍ॅड़ अमजद कुतुबुद्दीन मकराणी, इफ्तेकार कुतुबुद्दीन मकराणी, इम्तियाज कुतुबुद्दीन मकराणी, एजाज कुतुबुद्दीन मकराणी यांनी सगीर सय्यद व शाकिब सय्यद या दोघांवर तलवार व कुकरीने वार केले होते. त्यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले होते़ यानंतर मकराणी बंधूंनी जखमींच्या गळ्यातील सोनसाखळी व गल्ल्यातील तीस हजार रुपये दरोडा टाकून लुटून नेल्याची फिर्याद मोईन अली हुसेन पठाण यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली होती़अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही़ ए़ दौलताबादकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ सरकारी वकील अ‍ॅड. गायत्री पटनाला यांनी या खटल्यात अकरा साक्षीदार तपासून आरोपींवर गुन्हा सिद्ध केला़ त्यानुसार न्यायालयाने मकराणी बंधूंना सात वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास आणखीन सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली, तर मतीन शब्बीर काद्री, हसीफ उमर खान यांची निर्दोष मुक्तता केली़ जुने नाशिक परिसरातील नागरिकांचे या खटल्याकडे लक्ष लागून होते.