लासलगावी कांदा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:11 IST2019-11-05T13:11:13+5:302019-11-05T13:11:23+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांदा भावात चारशे रूपयांची घसरण झाली.

लासलगावी कांदा भावात घसरण
लासलगाव : येथील बाजार समितीत मंगळवारी कांदा भावात चारशे रूपयांची घसरण झाली. प्रथमच नवीन लाल कांदा बाजारपेठेत दाखल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणुन उन्हाळ कांदा भावात मंगळवारच्या तुलनेत आज चारशे रूपयांची घसरण होत ५३०१ हा सर्वाधिक भाव जाहीर झाला. लाल कांद्याची ४६ क्विंटल आवक होऊन ११०० ते ३८११ रूपये व सरासरी भाव ३१०१ रूपये जाहीर झाला. १७७ वाहनातील उन्हाळ कांदा आवक ३१७६ क्विंटल प्रति क्विंटल किमान २३०० ते ५३०१ रूपये भावाने विक्र ी झाला. दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी व लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील घटलेली कांदा आवक सोमवारीही कमी झाली होती. सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला होता. २ नोव्हेंबर रोजी या हंगामात कांदयाने आज सर्वाधिक ५३६९ रूपये भाव जाहीर झाला होता. आज सकाळ सत्रात २१ वाहनातील २३७ क्विंटल कांदा किमान १८९१ ते कमाल ५३६९ तर सरासरी ४९०१ रूपये भावाने विक्र ी झाला.