लासलगावी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 02:11 PM2019-10-08T14:11:40+5:302019-10-08T14:11:48+5:30

लासलगाव : येथे मंगळवारी सकाळी धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या साजरा करण्यात आला.

 Lasalgavi Dhammachakra Promoting Day Ceremony | लासलगावी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

लासलगावी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

Next

लासलगाव : येथे मंगळवारी सकाळी धम्मचक्र प्रवर्तनदिन मोठ्या साजरा करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला सुधाकर शेजवळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . सामुहीक त्रिसरण पंचशील पठण करण्यात आले . प्रकाश संसारे यानी आजच्या दिनाचे महत्व व बुद्ध धम्म आणि संघ ही त्रिरत्ने डॉ आंबेडकरानी समस्त भारतीय समाजाला दिलेला अमुल्य ठेवा असल्याचे सांगितले . डॉ अमोल शेजवळ यांनी भगवान गौतम बुद्ध यांची माहिती दिली. मिलिंद गायकवाड ; डॉ चारु दत्त अहिरे , सोनु शेजवळ , प्रज्ञा शेजवळ, भारती शेजवळ यानी मनोगत व्यक्त केले. भास्करराव शेजवळ , राजु शेजवळ, भास्कर गजरमल; अनिल सोनवणे ; रविंद्र जाधव ; सनि पाठक ; सुनिल पगारे ; दिपक संसारे ; सचिन निळे ; कैलास निळे ; संदिप निकम ; अरु ण दाभाडे आशा शेजवळ आदी उपस्थित होते . सुत्रसंचलन प्रकाश संसारे यानी तर आभार अमोल संसारे यानी केले .

Web Title:  Lasalgavi Dhammachakra Promoting Day Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक