लासलगावी लाल कांदा दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:43 IST2020-12-21T23:34:16+5:302020-12-22T00:43:26+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारी (दि.२१) उन्हाळ कांदा २०० तर लाल कांदा ७०० रुपयांनी घसरल्याने कांदा उत्पादकांच्या वतीने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.

लासलगावी लाल कांदा दरात घसरण
लासलगाव : येथील बाजार समितीत सोमवारी (दि.२१) उन्हाळ कांदा २०० तर लाल कांदा ७०० रुपयांनी घसरल्याने कांदा उत्पादकांच्या वतीने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारच्या तुलनेत ही घसरण झाली. सोमवारी ८२६ वाहनातील १०८६८ क्विंटल लाल कांदा १००० ते २००० व सरासरी १८५० रुपयांनी तर १७० वाहनातील १९१६ क्विंटल कांदा ५०० ते १६५१ व सरासरी १४५० रुपये भावाने विक्री झाला.
गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याची ४८,७२० क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ९०० तर कमाल ३२७० रुपये आणि सर्वसाधारण २३१० रुपये भाव राहिले. तर उन्हाळ कांद्याची १६७१८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ७००, कमाल ३०१२ रुपये आणि सर्वसाधारण १८०६ रुपये प्रतिक्विंटल भाव राहिले.