लासलगावी कांदा लिलाव सुरुच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:09 IST2021-04-17T20:58:44+5:302021-04-18T00:09:37+5:30
लासलगाव : येथील बाजार समितीत १९ ते २५ एप्रिल दरम्यान कांदा व धान्य लिलाव बंद राहणार असल्याचे संदेश समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावण निर्माण झाले होते. परंतु, बाजार समितीने बंदचा कोणताही निर्णय घेतला नसून कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज सुरळीत चालू राहणार असल्याचे स्पष्टीकरण बाजार समिती प्रशासनाने दिले आहे.

कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय लासलगाव व्यापारी असोसिएशनने घेतल्याचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबत बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी याबाबत व्यापारी असोसिएशनकडून अधिकृत कुठलेही पत्र प्राप्त झाले नसून तसेच कांदा आणि धान्य लिलाव बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. कांदा आणि धान्य जीवनावश्यक वस्तूच्या यादीत असल्याने तीन दिवसांच्यावर लिलावाचे कामकाज बंद ठेऊ नये अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.