शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

घरफोडीत लांबविले  सव्वा लाखाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:56 AM

शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून, अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : शाळांना असलेली उन्हाळी सुटी, लग्नसराईचा हंगाम यामुळे नागरिक बाहेरगावी जात असल्यामुळे बंद घरांना ‘लक्ष्य’ करण्याच्या घटना शहर व परिसरात सातत्याने सुरू असून, अंबड पोलीस ठाणे हद्दीत सिडको परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना दिवसाआड घडत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पाटीलनगरनंतर राणाप्रताप चौकात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याचे उघडकीस आले आहे.चोरट्यांसाठी लग्नसराई, सुटीचा हंगाम सुगीचा काळ ठरत असून भरदिवसा तसेच रात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करत रोकड, मौल्यवान वस्तू, दागिन्यांवर चोरटे हात साफ करत आहेत. दोन दिवसांपूर्वी सिडकोमधील पाटीलनगर भागात अशाच पद्धतीने घरफोडी करत चोरट्यांनी ७० हजारांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच दुसरी घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणाप्रताप चौकात घडली. येथील दत्तात्रय त्र्यंबक पाटील (४३) यांचे बंद घराचे कुलूप दोघा अज्ञात संशयितांनी शुक्रवारी (दि.१९) रात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास तोडले.घरातील ३ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, मणी, साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे कानातले वेल, आठ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ ग्रॅमचा चांदीच्या तोरड्याचा जोड, १२ हजार ५०० रुपयांची रोकड असा सुमारे १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा  ऐवज लुटून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी