घरफोडीत एक लाखाचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:11 IST2018-08-27T01:10:45+5:302018-08-27T01:11:04+5:30

तिडके कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़

Lampas at the top of the house | घरफोडीत एक लाखाचा मुद्देमाल लंपास

घरफोडीत एक लाखाचा मुद्देमाल लंपास

नाशिक : तिडके कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ महेश खिस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० ते २५ आॅगस्ट या कालवधीत चोरट्यांनी घरफोडी करून घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजन आणि रोख रक्कम असा ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  बसमधील बॅटऱ्यांची चोरी  नाशिक : दोन बसमधील चार बॅटºया चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकात घडली़ चोरट्यांनी बसस्थानकात  उभ्या असलेल्या एमएच १४ बीटी ४०५६ व एमएच १४ बीटी ५०३३ या दोन बसमधील ३० हजार रुपये किमतीच्या चार बॅटºया चोरून नेल्या़ या प्रकरणी विजयकुमार जाधव (रा. ता. खटाव, जि. सातारा) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

Web Title: Lampas at the top of the house