देवळालीगावात घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:54 PM2020-06-20T22:54:20+5:302020-06-20T22:55:58+5:30

नाशिकरोड : देवळालीगावातील घराचा कडीकोंडा तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला.

Lampas looted lakhs in burglary in Deolaligaon | देवळालीगावात घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

देवळालीगावात घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देदोन लाख ६० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : देवळालीगावातील घराचा कडीकोंडा तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. वकिली व्यवसाय करणारे धीरज अमीर मर्चंट (रा. सुंदर व्हिला रो-हाउस, देवळालीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते घराला कुलूप लावून मार्चमध्ये मुंबईला गेले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे तिकडेच अडकले होते. त्यावेळी शेजाऱ्यांनी फोन करून मर्चंट यांना सांगितले की, तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे. धीरज मर्चंट हे कुटुंबासह देवळालीगावात आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडून चांदीची एक लाख साठ हजारांची बिस्किटे आणि एक लाखाची रोकड असा सुमारे दोन लाख ६० हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला.

Web Title: Lampas looted lakhs in burglary in Deolaligaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.