घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:27 IST2019-03-17T00:19:38+5:302019-03-17T00:27:46+5:30
उपनगरजवळील खोडदेनगर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुगंधी तंबाखू, बिस्किट, चॉकलेट असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला.

घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
नाशिकरोड : उपनगरजवळील खोडदेनगर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुगंधी तंबाखू, बिस्किट, चॉकलेट असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला.
खोडदेनगर नीळकंठ निवास येथे राहणारे शिवाजी शंकरराव खंडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे राहते घर व भाडेकरू राठी यांना दिलेल्या गोडाऊनचे लॉक तोडून शटर वाकवून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी साडेसात हजार रुपये किमतीचे बिस्किट व जेली चॉकलेट व असा एकूण १ लाख ७ हजारांचा ऐवज चोरून नेला.