शहरात घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:57 IST2018-11-15T00:57:25+5:302018-11-15T00:57:41+5:30
शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ पंचवटी, इंदिरानगर व मुंबई नाका परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़

शहरात घरफोड्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास
नाशिक : शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ पंचवटी, इंदिरानगर व मुंबई नाका परिसरात या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत़ औरंगाबाद नाक्यावरील एका बंद बंगल्याची खिडकी उचकटून चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १३) दुपारी घडली़ शंकर चौधरी (विजयनगर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची बहीण विमलादेवी बाजिया यांच्या बंगल्याची खिडकी उचकटून चोरट्यांनी ३५ हजार रुपयांची रोकड, एलईडी टीव्ही, दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़