शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासनाच्या लॅब’चे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:17 IST

अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.

नाशिक : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे येथील अन्नपदार्थ पुणे, मुंबई अथवा भोपाळला पाठविण्यात येतात; मात्र नाशिकमध्ये प्रयोगशाळेसाठी जागा उपलब्ध असून, तेथे संरक्षक भिंतीचे कामही पूर्ण झालेले असताना इमारत बांधकामाच्या प्रस्तावावर गेल्या दशकभरात कोणतीही हालचाल न झाल्याने एफडीए लॅबचे घोंगडे भिजत पडले आहे.अन्न व औषध प्रशासनाचे काम थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. दुर्दैवाने नाशिकमधील अन्नपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा सुमारे १० वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या आरोग्य प्रयोगशाळेत अन्नपदार्थांऐवजी केवळ पाण्याच्याच नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांची अन्न सुरक्षा नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर अवलंबून आहे. एफडीएच्या वतीने पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि औषधांचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येतात. नाशिकमधील लॅब बंद पडल्याने अन्नपदार्थांचे नमुने मुंबई, पुणे तसेच भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात.  या नमुन्यांची १४ दिवसांत तपासणी होऊन त्यांचा अहवाल अपेक्षित असताना प्रत्यक्षात या प्रयोगशाळांवर असलेल्या भारामुळे साधारण दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळानंतर नमुन्यांचा अहवाल प्राप्त होतो. यामुळे एफडीएकडून कार्यवाहीलाही विलंब होतो. तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी ही अडचण लक्षात घेऊन मुंगसरे येथील गट क्रमांक १६६मधील दोन एकर जागा २३ नोव्हेंबर २०११ रोजी एफडीएला दिली. या जागेत अत्याधुनिक लॅब तसेच स्टोअरेज व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठविला; मात्र त्याचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. सध्या या जागेवर संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यालाही दोन वर्ष उलटले आहे. परंतु, प्रत्यक्ष प्रयोगशाळेच्या इमारतीच्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नसून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच इमारतीचे बांधकाम सुरू होऊ शकणार आहे.मुंगसरे येथील दोन एकर जागेत संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या जागेत फूड लॅब तसेच गुदामाच्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळू शकते. मंजुरी मिळाली की बांधकाम सुरू होईल.  - उदय वंजारी, सहआयुक्त, एफडीए  प्रयोगशाळेला प्राधान्य का नाही?मुंगसरे येथे एफडीएला जागा मिळाली. त्यानंतर केवळ संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले. एफडीएची लॅब नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असताना या कामाला प्राधान्य मिळत नसल्याने सरकारने जाणीवपूर्वक हा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे की, एफडीएच्या अधिकाºयांना ही जबाबदारीच नको आहे, असा सवाल प्रयोगशाळेच्या इमारतीला होणाºया दिरंगाईमुळे उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग