विहिरीत पडून मजूर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:14 IST2019-05-18T23:39:08+5:302019-05-19T00:14:32+5:30
सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत पडून मजूर ठार
नाशिक : सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भारत दामू गुळवे (४८, रा. रामनगर) हे गुळवे शनिवारी (दि.१८) सकाळी डुबेरे येथील मनोज परशराम डोली यांच्या शेतातील खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत उतरत असताना ही घटना घडली. अचानक क्रे नचा वायररोप तुटल्याने भारत गुळवे विहिरीत पडला होते. यावेळी क्रेनवरून त्यांचा तोल गेल्याने ते अचानकपणे विहिरीत कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने ठेकेदार भाऊसाहेब रानू खताळे यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यास तपासून मयत घोषित केले.