शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कुसुमाग्रज अध्यासनाची युवकांसाठी लेख स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:10 PM

12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक - 12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लेख स्व-लिखीत असावा आणि मुद्रीत, इलेक्ट्रॉनीक किंवा समाज माध्यमांवर प्रकाशित झालेला नसावा. लेख किमान 1500 तर कमाल 2500 शब्दांत असावा. युनीकोड/मंगल फॉन्ट मध्ये टाईप करून kusumagrajchair@ycmou.ac.in या इमेलवर स्पर्धकांनी लेख पाठवायचा आहे. इतर फॉन्टमधील लेख स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. इ-मेलने पाठवलेल्या लेखाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठवायची आहे. लेखाच्या पानावर स्पर्धकाने आपले नाव अथवा ओळख पटेल असा कोणताही मजकूर लिहू नये. स्पर्धकाने लेखासोबत वयाचा पुरावा देणारे प्रमाणपत्र जोडावे. स्पर्धकाने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आदि तपशील स्वतंत्रपणे द्यावा. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून एका स्पर्धकाला एकच लेख पाठवता येईल. स्पर्धेसाठी नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील. स्पर्धकानी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले लेख kusumagrajchair@ycmou.ac.in या इमेलवर पाठवावेत. लेखाची हार्ड कॉपी पोस्टाने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत विद्यापीठात प्राप्त होईल अशा बेताने पाठवावी. लेखाची हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता :-     डॉ. प्रवीण घोडेस्वार,     समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन,     यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – 422 222

    स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. 5000/- (प्रथम क्रमांक), रु. 4000/- (द्वितीय क्रमांक), रु. 3000/- (तृतीय क्रमांक), आणि रु. 1000/- प्रत्येकी 3 उत्तेजनार्थ विजेत्यांना एवढ्या रक्कमेची पारीतोषीके दिली जातील. या स्पर्धेचा निकाल 27 फेब्रुवारी 2022 मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला जाहिर करण्यात येईल. स्पर्धेबाबतचा अधिकचा तपशील विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी केले आहे.

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजmarathiमराठीNashikनाशिक