शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा : २६९ एकर जागा तात्पुरती अधिग्रहित

By admin | Updated: August 21, 2014 00:14 IST

साधुग्रामचा मार्ग मोकळा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्यासाठी राज्य सरकार व महापालिका एकमेकांवर चालढकल करीत असताना, आता त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनेच साधुग्रामसाठी २६९ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याचा अध्यादेश जारी केला असून, येत्या दोन महिन्यांत सदरची जागा ताब्यात घेऊन ती महापालिकेकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिल्याने येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील कार्यवाही सुरू होण्याची चिन्हे आहेत. साधुग्रामसाठी तीनशे एकर जागा कायमस्वरूपी असावी, अशी साधू-महंतांची मागणी आहे. त्या अनुषंगाने सिंहस्थ कृती आराखड्यातही जागा संपादनाबाबतचा प्रश्न यापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील शिखर समितीच्या बैठकीत चर्चिला गेला. परंतु तपोवनातील शेतकऱ्यांचा जागा देण्यास तीव्र विरोध असून, काही जागांवर तर पक्की बांधकामेही झालेली आहेत. अशा परिस्थितीत साधुग्रामसाठी जागा कोणी संपादित करावी यावरून राज्य सरकार व महापालिका यांच्यात कलगीतुरा रंगला होता. नोव्हेंबर २०१३ मध्ये राज्य सरकारने आदेश काढून महापालिकेवर त्याची जबाबदारी ढकलली, तर महापालिकेनेही महासभेत ठराव करून शासनाकडे भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भूसंपादन करणे आता कायदेशीर, व्यावहारिक व तांत्रिकदृष्ट्याही शक्य नसल्याने अखेर शासनाने साधुग्रामसाठी २६९ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याचे ठरविले. गेल्या तीन दिवसांपासून त्यासाठी मेळा अधिकाऱ्यांनी मंत्रालयात तळ ठोकल्यानंतर बुधवारी शासनाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला व जिल्हाधिकाऱ्यांनी जागा अधिग्रहित करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, त्यासाठी जमीनमालकांना नोटिसा, त्यांच्या हरकती व सूचनांची सुनावणी करून जागा अधिग्रहित करण्यात यावी, असे या अध्यादेशात म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या ताब्यात जागा हस्तांतर करण्याचे आदेशही यात देण्यात आले आहेत.