थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:09 AM2018-12-29T01:09:41+5:302018-12-29T01:10:13+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

 The Kudkudas of the Kudkudas in the cold stitched around the office overnight | थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

थंडीत कुडकुडत आदिवासींचा रात्रभर कार्यालयासमोर ठिय्या

Next

चांदवड : आपल्या विविध मागण्यांसाठी चांदवड तालुका किसान सभेच्या वतीने येथील पूर्व विभाग वनक्षेत्रपाल कार्यालयावर रात्रभर थंडीत कुडकुडत तब्बल २९ तास धरणे आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी अश्वासनानंतर शुक्रवारी आंदोलन मागे घेण्यात आले.
वनजमिनी नावावर कराव्यात, पिण्याच्या पाण्यासाठी व लाइटसाठी ना हरकत दाखला ताबडतोब मिळावा, बिगर आदिवासींना ७५वर्षाचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरावा व कायद्यानुसार तो दावा पात्र करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी दुपारी १ वाजेपासून वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मनमाड विभागाच्या पोलीस उपअधीक्षक रागसुधा आर. सहायक वनसरंक्षक राजेंद्र कापसे ,चांदवडचे वनक्षेत्रपाल संजय पवार, तहसीलदार डॉ.शरद मंडलीक, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी डॉ. शिवबाला व आंदोलनकर्त्याचे प्रमुख आमदार जे.पी. गावित, जिल्हा सचिव सुनील मालुसरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर २९ तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दि. ३ जानेवारीला मार्ग न निघाल्यास जिल्हाभरातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपसरंक्षक डॉ.शिवबाला यांच्या कार्यालयावर मुक्काम ठोकतील असा इशारा यावेळी जिल्हा सचिव सुनील मालुसरे, जिल्हा सदस्य कॉ. हनुमंता गुंजाळ, रमेश चौधरी यांनी दिला. आंदोलनातील आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी व विजेसाठी ना हरकत दाखला देण्याचे अधिकार मनमाड येथील सहायक वनसरंक्षक अधिकारी राजेंद्र कापसे व चांदवड वनक्षेत्रपाल अधिकारी संजय पवार यांना नसल्याने आंदोलनकर्त्यांचा मुक्काम २९ तासापर्यंत वाढल्याचे ते म्हणाले.
उनसंरक्षक डॉ. शिवबाला यांची वाट पाहूनही ते आले नाही. दरम्यान, प्रांताधिकारी भंडारे यांनी जिल्हाधिकारी, उपसरंक्षक अधिकारी डॉ. शिवबाला, आमदार जे.पी.गावित यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा सचिव सुनील मालुसरे, कॉ. हनुमंता गुंजाळ व पदाधिकाºयांचे बोलणे करुन दिले व लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.
कॉ.हनुमंत गुंजाळ, तुकाराम गायकवाड, सुकदेव केदारे, राजाराम ठाकरे, दत्तू भोये, जयराम गावित, दौलत वटाणे, हनुमान मोरे, शंकर गवळी, शिवाजी सोनवणे, सुरेश पवार, साहेबराव गांगुर्डे यांच्यासह सुमारे सहाशे महिला व पुरुषांनी या आंदोलनात सहभाग घेतला. चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडनेरभैरवचे सहायक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, रामचंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून जादा पोलीस फौज मागविण्यात आली होती.
आंदोलनकर्त्यांना जेवण
च्गुरुवारी सर्वच अधिकाºयांनी रात्री उशिरापर्यंत अनेक तडजोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र किसान सभेच्या महिला व पुरुषांनी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार करत वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात रात्रभर थंडीत मुक्काम ठोकला. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत याप्रश्नी मार्ग निघेल असा अंदाज होता. यासाठी आमदार जे.पी. गावित, उपवनसरंक्षक डॉ. शिवबाला यांची आंदोलनकर्ते वाट पाहत होते. दरम्यान, वनक्षेत्रपाल आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुमारे सहाशे आंदोलक पुरुष-महिलांना जेवणही देण्यात आले.

Web Title:  The Kudkudas of the Kudkudas in the cold stitched around the office overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.