कृष्णगावी कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:14 IST2021-06-05T01:13:52+5:302021-06-05T01:14:08+5:30

वणीपासून सुमारे दोन किलोमीटर  अंतरावर असलेल्या कृष्णगाव परिसरात धावत्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

Krishnagavi car took the stomach | कृष्णगावी कारने घेतला पेट

कृष्णगावी कारने घेतला पेट

वणी : वणीपासून सुमारे दोन किलोमीटर  अंतरावर असलेल्या कृष्णगाव परिसरात धावत्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 
शुक्रवारी (दि.४)  दुपारी ४ वाजेच्या सुमारास वणी- दिंडोरी रोडवरील कृष्णगाव परिसरात (एमएच-१२ जेके-०७००) या सिलोरिया कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये धूर दिसू लागताच कारचालक स्वप्नील आहेर, रा. गंगापूर यांनी कार थांबविली.  
प्रसंगावधान राखत  ते कारमधून बाहेर पडले व  वणी पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टिने  रस्त्यावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली. कृष्णगाव ग्रामपंचायतीने पाण्याच्या टँकरच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तद्‌नंतर पाचारण केलेल्या अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. दरम्यान,  वाहनचालाकांनी वाहनाची व वायरिंगची नियमित तपासणी करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले आहे.

Web Title: Krishnagavi car took the stomach