शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

कोकाटेंच्या मैत्रीपूर्ण लढतीमुळे गोडसेंची अडचण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:23 AM

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात हात आखडता घेतल्याने कोकाटेंची ही बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढत, असा प्रश्न युतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिक मतदारसंघात बंडखोरी केल्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात हात आखडता घेतल्याने कोकाटेंची ही बंडखोरी की मैत्रीपूर्ण लढत, असा प्रश्न युतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कोकाटे यांच्या या कथित मैत्रीपूर्ण लढतीमुळे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपने अगोदरच तयारी केली होती. परंतु नंतर शिवसेनेशी युती झाल्यानंतर वातावरणच बदलले. युतीकडून विद्यमान खासदाराला उमेदवारी मिळणे अपेक्षितच होते. परंतु अ‍ॅड. कोकाटे हे थांबण्यास तयार नव्हते. पक्षाने सांगितले म्हणून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आता कार्यकर्त्यांना काय सांगू, असा प्रश्न करीत त्यांनी निवडणूक लढणारच असे जाहीर केले. त्याचवेळी त्यांनी आपण पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देणार आहोत, तो मान्य झाल्यास ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर कोकाटे यांनी बंडखोरी केली; परंतु पक्षाने मात्र अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने ही मैत्रीपूर्ण लढत आहे की काय, असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.सुरुवातीला कोकाटे यांचे मन वळविले जाईल, मग ते माघार घेतील, असा अंदाज शिवसैनिक बांधत होते. कोकाटे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीरसभा घेऊन त्याच दिवशी भूमिका जाहीर केली असली तरी आता माघारीची मुदत संपूनही तीन दिवस उलटले; परंतु पालकमंत्री गिरीश महाजन यांची ‘शस्रक्रिया’ यशस्वी ठरली नाही की कोकाटे यांना अभय दिले गेले, असा हा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणूनही कार्यकर्ते पडले संभ्रमात४अ‍ॅड. कोकाटे यांनी निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर घेतलेल्या सभेत राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. परंतु भाजपवर मात्र त्यांनी सौम्य टीका केली. कोकाटे यांच्या या भूमिकेमुळे त्यांना भाजपचे पाठबळ आहे काय अशीदेखील शंका शिवसैनिक उपस्थित करीत आहेत.कोकाटे यांच्याबद्दल अद्याप एकाही भाजप नेत्याने उघडपणे त्यांच्याविरुद्ध टीका केलेली नाही. त्यामुळे कोकाटे यांना भाजपचे आतून समर्थन आहे की काय, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, कोकाटे यांच्या कथित मैत्रीपूर्ण लढतीने हेमंत गोडसे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक