खासगी मिनी बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:44 IST2019-02-14T17:44:13+5:302019-02-14T17:44:34+5:30
नांदूरशिंगोटे : खासगी मिनी बस व दुचाकी यांच्या धडकेत सुरेगाव येथील युवक ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

खासगी मिनी बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार
नांदूरशिंगोटे : खासगी मिनी बस व दुचाकी यांच्या धडकेत सुरेगाव येथील युवक ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर नांदूरशिंगोटे शिवारात आव्हाड वस्तीजवळ सदर अपघात झाला.
गणेश पाटीलबा इलग (३२) रा. सुरेगाव हा युवक प्लॅटिना मोटारसायकल (एम. एच. १५ जी. बी. ८६३४) ने कासारवाडी येथून घराकडे जात असतांना समोरुन येणारी मिनी बसने (क्र. एम. एच. १५ इ. एफ. ७७०७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघात इलग गंभीर जखमी झाला. पोलीस हवालदार सुधाकर चव्हाणके व नागरिकांनी मदत करुन त्यास उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.