नाशिक : कामटवाडा परिसरात खासगी बसने दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड लिंकरोडवरील न्यू पद्मा हॉटेलशेजारील ज्ञानदा बिल्डिंगमध्ये राहणारे नितीन रघुनाथ झेंडे (४८) हे रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ज्ञानेश बिल्डिंगसमोरून जात असताना त्यांना एका खासगी बसने धडक दिली़ यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी संजय कुलकर्णी यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ खैरकर यांनी तपासून मयत घोषित केले़ या अपघाताची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}