येवला तालुक्यातील मायलेक अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:49 IST2018-04-10T00:49:16+5:302018-04-10T00:49:16+5:30
येवला : मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारामध्ये सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मायलेक ठार झाल्याची घटना घडली.

येवला तालुक्यातील मायलेक अपघातात ठार
येवला : मनमाड रस्त्यावर बाभूळगाव शिवारामध्ये सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील मायलेक ठार झाल्याची घटना घडली. शिर्डीहून रात्रीच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम उरकून सकाळी लवकर येवला तालुक्यातील आंबेवाडी येथे दुचाकीवरून परतत असताना रंजना बाळू मेमाणे (३९), गोकुळ बाळू मेमाणे (२०) या दोघा मायलेकांना अज्ञात वाहनाने धडक दिली. वाहनाच्या जबर धडकेने रंजना मेमाणे या जागीच ठार झाल्या, तर गोकुळला नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गोकुळच्या पश्चात वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार जी.एम. नागरे करत आहे. दोघा मृतांवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.