‘खाकी’मधील दर्दी करतोय बेघरांची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:13 IST2019-05-18T23:50:11+5:302019-05-19T00:13:26+5:30
शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये संसार थाटून रस्त्यावर जगणाºयांची ‘काळजी’ चक्क शहर पोलिसांकडून दाखविली जात आहे.

‘खाकी’मधील दर्दी करतोय बेघरांची विचारपूस
नाशिक : शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये संसार थाटून रस्त्यावर जगणाºयांची ‘काळजी’ चक्क शहर पोलिसांकडून दाखविली जात आहे.
भिक्षुकांच्या जवळ जाऊन पोलीस विचारपूस करत त्यांची माहिती नोंदवून घेताना दिसत आहेत. परिमंडळ एक-दोनमध्ये चार महिला-पुरुष पोलिसांचे मिळून चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे सीबीएस, पंचवटी, गोदाकाठ, गंगापूररोड, शरणपूररोड, शालिमार, जुने नाशिक, नाशिकरोड, सिडको, उपनगर, सातपूर, इंदिरानगर अशा विविध भागांमध्ये गस्त करून रस्त्यांवर जगणाºयांचा शोध घेतला जात आहे. एकाकी राहणारे भिकारी, कु टुंबाने राहणारे भिकारी, महिला, बालकांचे भिकाºयांमधील प्रमाण, वृद्धांची संख्या लक्षात घेत भिकाºयांचे सर्वेक्षण केले जात आहे. आठवडाभरात हे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे चारही पथकांकडून भिकारी सर्वेक्षण अहवालाचे सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर भिकाºयांच्या पुनर्वसनाकरिता कशा पद्धतीने पावले उचलता येतील, यादृष्टिक ोनात निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी पोलिसांना काही सामाजिक, स्वयंसेवी संघटनांसह सरकारी संस्थांचीही मदत होते.
सामाजिक संवेदना जपण्याचा प्रयत्न
सामाजिक संवेदनांची जाणीव ठेवत भिकाºयांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. भिकाºयांनाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार असून नियतीने जरी त्यांच्या झोळीत अठराविसवे दारिद्र्य टाकले असले तरी ‘खाकी’ने त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद म्हणावे लागेल.