Khaira's illicit traffic 'break' | खैराच्या अवैध वाहतुकीला ‘ब्रेक’

चिंचओहोळजवळ खैराची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह लाकडे जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देहरसूल वनपरिक्षेत्र : गुजरातच्या टोळीची घुसखोरी; दीड लाखाचा साठा जप्त

नाशिक : गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिकच्या हरसूल वनपरिक्षेत्र हद्दीतील चिंचओहोळ वनपरिमंडळातील शेवगापाडा येथून खैराच्या वृक्षांची चोरटी तोड करून बुंधे मोठ्या संख्येने वाहून थेट गुजरात सीमेच्या दिशेने एका टेम्पोतून नेले जात होते. याबाबत वनविभागाच्या गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने रात्रीच्या अंधारात टेम्पोचा सिनेस्टाइल पाठलाग करत खैराच्या वाहतुकीला ‘ब्रेक’ लावला; मात्र चोरटे निसटून जाण्यास यशस्वी ठरले. टेम्पोतून (जी. जे. १७ टी ७६०६) खैराचे सुमारे ४१ नग जप्त करण्यात आले असून, सुमारे दीड लाख
रु पयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चिंचओहोळ-शेवगापाडा भागातून अवैधरीत्या तोडलेल्या खैराच्या वृक्षाचे बुंधे वाहून नेले जाणार असल्याची गोपनीय माहिती वनरक्षक किरण गवळी, राजेंद्र चौधरी, उमेश भोये, पोपट राऊत, वाहनचालक संजय भगळे यांच्या पथकाला मिळाली. तत्काळ गवळी व चौधरी यांनी आपले गस्ती वाहन भगळे यांना घटनास्थळाच्या दिशेने घेण्यास सांगितले. दरम्यान, शेवगापाडा फाटा येथे सर्वप्रथम त्यांनी सापळा रचला असता तस्करांचे वाहन काही वेळेत येताना नजरेस पडले आण िपथक सावध झाले; मात्र खैराची वाहतूक करणार्या टेम्पोच्या चालकाने काही अंतरावरूनच वनखात्याची सरकारी गाडी ओळखून दुसर्या रस्त्याने वाहन धाडले. ही बाब लक्षात येताच भगळे यांनीही सरकारी वाहन त्यांच्यामागे भरधाव घेतले.
टेम्पोचा वेग अधिक व दुर्गम भागातील एकेरी रस्ता यामुळे गस्ती पथकाचे वाहन ओव्हरटेक करण्यास अपयशी ठरत होते. ही बाब लक्षात येताच पथकाने कौशल्याचा वापर करत अन्य शॉर्टकट कच्च्या रस्त्याचा पयार्य स्वीकारला आण ितस्करांच्या वाहनाच्या अगोदर पोहचून मुख्य रस्त्यावर शेवगेपाडा येथे पुन्हा सापळा रचला. काही वेळेतच मुख्य रस्त्याने भरधाव टेम्पो पथकाच्या सरकारी वाहनाजवळ आला यावेळी टेम्पोचालकाने वाटेत उभ्या असलेल्या पथकाच्या वाहनाला ‘कट’ मारु न टेम्पो पुढे नेला; मात्र त्याच्या टेम्पोत तांत्रिक बिघाड झाल्याने टेम्पो अचानकपणे बंद पडला. पथक टेम्पोपर्यंत पोहचत नाही तोच टेम्पोचालक व त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत टेम्पो सोडून जंगलात फरार होण्यास यशस्वी
झाले.
टोळी जेरबंद करण्याचे आव्हान
तस्करांनी खैराची वृक्ष काही दिवसांपुर्वीच कापून जंगलात लपवून ठेवली होती. तोडलेला खैर वाहून नेण्याची चोरटे संधी शोधत होते. हरसूल या वनपरिक्षेत्राला अद्याप वनक्षेत्रपालच मिळत नसल्याने येथील धाडसी वनरक्षक, वनपाल, वनमजूरांवरच वनसंपदेची दारोमदार आहे. चिंचआहोळ-शेवगापाडा रस्त्यावर मध्यरात्री अंधाराचे साम्राज्य असताना वनरक्षक, वनमजूरांनी केलेली खैर जप्तीची कारवाई त्याचे मुर्तीमंत उदाहरण आहे. गुजरात सीमेपलीकडून नाशिक पश्चिम वनविभागाच्या हद्दीतील खैर, सागाच्या जंगलात सक्र ीय झालेली तस्करांची टोळी जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: Khaira's illicit traffic 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.