शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

केवडीबन म्हसोबा महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 1:12 AM

शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

ठळक मुद्देभाविकांची दर्शनासाठी गर्दी : सोंगे नाचविण्याची परंपरा

पंचवटी : शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केवडीबन येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला विधीवत सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला. महापूजा, आरती, बोहाडा सोंग नाचविणे आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म आणि भाविकांची अमाप गर्दी अशा भक्तिमय वातावरणात यात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.तपोवनातील श्री म्हसोबा महाराज बहुउद्देशीय मंडळातर्फे केवडीबनातील म्हसोबा महाराज मंदिरात मे महिन्यात दरवर्षी यात्रेचे आयोजन केले जाते. रविवारी सकाळी यात्रेची सुरुवात पहाटे ६ वाजता म्हसोबा महाराजांच्या महापूजेने करण्यात आली. उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजन झाले. सकाळी १० वाजता पंचवटी महाविद्यालय ते केवडीबन देवस्थानपर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन ध्वजाची स्थापना करण्यात आली. यावेळी बोहड्याच्या कार्यक्र मात पौराणिक काळातील विविध देवीदेवतांचे सोंगे मिरविण्यात आले. वाद्याच्या तालावर दशावतारी सोंगे म्हसोबा महाराज यात्रेतील आकर्षण ठरले. त्यानंतर दुपारी जनार्दन स्वामी आश्रमाचे संतोषगिरी महाराज, रामगिरी महाराज यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी देवी व म्हसोबा महाराज यांचे युद्ध देखावा झाल्यानंतर कार्यक्र माची सांगता करण्यात आली.म्हसोबा महाराज यात्रोत्सवाला रामगिरी महाराज, मनकामेश्वर मंदिराचे परमेश्वरदास महाराज, श्रीराम शक्तिपीठाचे धर्माचार्य बालब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य महाराज, श्रवणगिरी महाराज, संतोषगिरी महाराज आदी साधू- महंतांसह आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार जयंत जाधव, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, नगरसेवक रु ची कुंभारकर, प्रियंका माने आदींसह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्र माचे संयोजन रमेश कचरे, ज्ञानेश्वर सोनवणे, दत्तात्रय लिलके, कैलास क्षीरसागर, सुधाकर चव्हाण आदींनी केले होते. यात्रोत्सव निमित्ताने तपोवन केवडीबन श्री म्हसोबा महाराज मंदिरात शेकडो भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम