चाळीत साठवलेल्या कांद्यांचे पंचनामे करा : शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 19:25 IST2018-12-30T19:25:27+5:302018-12-30T19:25:50+5:30
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लक चाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.

चाळीत साठवलेल्या कांद्यांचे पंचनामे करा : शेतकऱ्यांची मागणी
खमताणे : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एप्रिल -मे महिन्यात शेतातून कांदा काढल्यावर तो चाळीत साठवला जातो. यावर्षी नऊ महिने उलटून सुध्दा भाव वाढले नाही. उलट भाव कमी होऊन ते १०० रू प्रतिक्विंटल झाले.
यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अजुनही अनेक शेतकºयांचा कांदा चाळीतच शिल्लक आहे. शासनाने अनुदान जाहीर केले. मात्र ते ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळातच कांदा विकी केलेल्या शेतकºयांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे चाळीत शिल्लक असलेला कांदा या नियमात बसत नाही. या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने शिल्लक
चाळीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खमताणे भागातील शेतकर्यांनी केली आहे.