शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचे औचित्य : चांदवडला गर्दी वाढली, सुरक्षिततेसाठी एकाच रांगेतून भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश

By admin | Updated: September 28, 2014 22:35 IST

रेणुकामातेच्या चरणी भाविक नतमस्तक

चांदवड : चांदवड निवासिनी श्री रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवात आज चौथ्या माळेला रविवार सुटीचे औचित्य साधून लाखो भाविक श्री रेणुका देवीच्या चरणी नतमस्तक झाले. यंदाच्या वर्षी २४ तास भाविकांची गर्दी होत असून, सुरक्षितेच्या कारणासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एकाच रांगेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येत आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी दोन स्वतंत्र जिन्याची व्यवस्था केली आहे. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा गर्दी वाढत आहे.यात्रोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी, गृहरक्षकदल पुरुष, महिला कर्मचारी कार्यरत आहे, तर ग्रामपंचायत सरपंच विजय कोतवाल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी डी. आर. ठाकरे यांनी रस्त्यावर ठिकठिकाणी विद्युत दिव्याची व पाण्याच्या टँकरची सोय केली आहे. या उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून, विविध मान्यवरांच्या हस्ते महाभिषेक व शतचंडी, नवचंडी यज्ञ, होमहवन होत असून, महाआरतीसाठी चंद्रेश्वर भक्तमंडळाचे कार्यकर्ते मदत करीत आहे. यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव यशस्वीतेसाठी व्यवस्थापक एम. के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, तान्हाजी अहिरराव, पुरोहित प्रकाश वैद्य, हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी, नारायण कुमावत, खंडू अहेर, हरिभाऊ कासव, काळू पवार व सामाजिक कार्यकर्ते किसन बल्लाळ, जगन्नाथ राऊत, दिनकर कोतवाल, शेरू ब्रदर्स, दीपक कुमावत व चंद्रेश्वर भक्तमंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.