शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा प्रकरणातील छबू नागरेला जामीन

By admin | Updated: April 4, 2017 01:32 IST

नाशिक : बनावट नोटा छापून त्या कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमुख संशयित छबू दगडू नागरे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सोमवारी (दि़३)जामीन मंजूर केला़.

नाशिक : चलनातील पाचशे व एक हजार रुपये दंडाच्या बनावट नोटा छापून त्या कमिशनपोटी बदलून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अकरा संशयितांमधील प्रमुख संशयित तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू दगडू नागरे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सोमवारी (दि़३) अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला़ दरम्यान, या गुन्ह्यातील दहा संशयितांना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे़राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे याने कमिशनवर जुन्या नोटा बदलून देण्यासाठी राहत्या घरी एक कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा छापल्या़ या नोटा कमिशनवर बदलण्यासाठी तो आपल्या अकरा साथीदारांसमवेत स्कोडा (एमएच १५, सीएम ७००२), फोर्ड फिगो (एमएच ०४, इएफ ९७०१) व सियाझ (एमएच १५, एफएच २१११) या तीन वाहनांतून २२ डिसेंबर २०१६ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जात असताना शहर पोलिसांनी हॉटेल जत्रासमोर अडवून या सर्वांना अटक केली होती़ या संशयितांकडून १़३५ कोटींच्या बनावट नोटा व वाहनेही जप्त करण्यात आली होती़आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नागरे हा २३ ते २९ डिसेंबरदरम्यान पोलीस कोठडीत व त्यानंतर नाशिकरोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता़ या प्रकरणातील बारा संशयितांपैकी दहा संशयितांचा यापूर्वीच जामीन झाला असून, सोमवारी नागरेचा जामीन झाल्याने अकराही संशयित आता जामिनावर आहेत़ दरम्यान, नागरेला जामीन देताना न्यायालयाने अटी व शर्तींचे पालन करण्याची अट घातली असून, उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाणार आहे़ (प्रतिनिधी)