शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

जिजामाता जन्मोत्सव राष्ट्रीय प्रेरणेचा स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:12 PM

राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेबांच्या ४२२ व्या जयंती निमित्त एक प्रकाशझोत....

ठळक मुद्देजिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधनजय जिजाऊ ,जय शिवरायजिजाऊंचे चरित्र राष्ट्रीय दृष्ट्रीने आदर्शवत

ज्या शूर स्त्री - पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही अभिनंदन केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्या बद्दल ची आपल्या अंगी वसत असलेली कृतज्ञता बुध्दी हेच मुख्य कारण होय. ज्या प्रमाणे आंम्ही आपल्या घराण्याचा पुर्वपार चालत आलेला लौकिक राखण्याचे एक साधन करून ठेवतो तद्वतच राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे ,राष्ट्रीयत्व ही एक चांगल्या प्रकारची राष्ट्रीय भावना असून ती सतत जागृत ठेवली तरच ती टिकण्या सारखी आहे .ज्या ज्या राष्ट्रांनी ती कायम राखली आहे त्यांनी आपल्या ऐतीहासीक थोर स्त्री पुरूषांच्या इतिहासाच्या कामी योग्य मदत घेतली .महाराष्ट्रातीलच न्हवे तर देशातील निरनिराळ्या जातीचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्या सारखे स्थळ सांगावयाचे झाले तर ते राष्ट्रमाता जिजाऊंचे आणि छत्रपती शिवरायांचे चरित्र होय .राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा दशदिन जन्मोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागे त्यांच्याबद्दलची आमच्या ठाई वसत असलेली कृतज्ञता बुध्दी हे प्रमूख कारण आहे .म्हणूनच राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा ही अग्रणी मागणी लोकजनतेपूढे आली.*वैयक्तीक स्वतंत्र कतृत्वाचा लौकीक लाभलेली लोकमाता*सूमारे चारशे वर्षापूर्वी जिजामातेंच्या रूपाने मातृतिर्थ सिंदखेडराजाला अशी एक शक्ती जन्माला आली की जीने दृष्टांचे निर्दालन आणि सृष्टांचे संरक्षण करण्याची प्रेरणा दिली . अन्याय ,अत्याचार या विरूध्द लढण्याची जिद्द या महाराष्ट्र भूमीत निर्माण केली . माँ जिजाऊं चा जन्म ही भावी इतिहासाला कलाटणी देणारा ठरला त्यांच्यामुळेच जाधव व भोसले दोन मातब्बर घराणी एकत्र जोडली गेली .जिजाऊ मॉ साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सुसंस्काराच्या बळावर छत्रपती शिवाजी राजांच्या रूपाने एक महान व्यक्तीत्व घडवले की त्यांना जगाच्या इतिहासात तोड नाही .राष्ट्रीयता ,स्वातंत्र्य ,स्वराज्य आणि सर्व धर्म समभावाचे बाळकडू त्यांनीच महाराजांना दिले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कतृत्वावर राजमाता जिजाऊंच्या शिकवणूकीचा ठसा उमटला होता .जिजामाता अत्यंत धाडसी ,संकटाला न घाबरता संकटांवर मात करणाऱ्या ,आपल्या ध्येया पासून तसूभरही मागे न हटणाऱ्या होत्या . शहाजी राजांसारख्या शूर - विर ,पराक्रमी ,साहसी स्वतंत्र राज्याची महत्वकांक्षा बाळगाणाऱ्या पुरूषाची पत्नी म्हणून त्यांचा लौकीक होताच पण त्याच बरोबर त्यांचा वैयक्तीक स्वतंत्र कतृत्वाचा लौकीक ही वाखाणण्या जोगा होता .या संबंधात छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचे जेष्ठ बंधू संभाजी यांची आई जिजाऊ संबंधी शहाजी राजांच्या दरबारातील कवी जयराम पिण्डे ' राधामाधवविलास चंपू" या आपल्या ग्रन्थात लिहता की ," जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई ।भली शोभली ज्यास जाया जिजाई क जिचे किर्तिचा चंबू जंबूद्विपाला । करी साऊली ,माऊली मुलाला ॥ १३१॥याचा भावार्थ असा की जिजाई ही शहाजी सारख्या स्वाभिमानी ,धाडसी ,उदार आणि पराक्रमी पुरूषाला चांगलीच साजण्या जोगी बायको होती . आणि ती केवळ नवऱ्याच्या किर्तीवर ओळखली जात नसून स्वतःच्या धिर ,उदार ,करारी ,गंभीर वृत्तीने त्यांची किर्ती त्या काळी सर्व भारत खंड भर पसरली होती ,इतकेच न्हवे तर त्यांच्या किर्तीच्या घूमटाच्या सावली खाली संपूर्ण जंबू द्विप म्हणजे जंबूद्विपातील सज्जन लोक यवनाच्या जुलमाला कंटाळून आश्रयाला येत असत .असे जिजाऊ साहेबांना प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेल्या आणि शहाजी राजांच्या दरबारात वावरत असलेल्या कवी जयराम यांनी मोजक्या शब्दात जिजाऊंच्या कतृत्वाची महती सांगितली आहे ,यावरून जिजाऊ साहेबांच्या कतृत्वाचा लौकीक किती मोठा होता याची कल्पना येते .

छत्रपती शिवरायांच्या मार्गदर्शक कृतीशिल मातास्वतंत्र राज्य स्थापण्याची महत्वकांक्षा शहाजी राजे उराशी बाळगून होते पण तत्कालिन परिस्थिती स्वतंत्र राज्य स्थापनेला अनुकूल नसतांना देखील त्यांना एक नाही तर दोन वेळा सत्ता हस्तंगत करण्याचा आणि स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी जिजाऊंनी पतीला पूर्ण सहकार्य केले .शेवटी शहाजी राजांनी जिजाऊंच्या संगनमताने स्वतंत्र राज्य स्थापन्याचा संकल्प केला . त्यासाठी शहाजी राजांनी आपली पत्नी जिजाऊ आणि 12 वर्षाचा शिवबा यांना बंगळूराहून सर्व तयारीनिशी आपल्या पुण्याच्या जहागिरीत पाठवून स्वतंत्र राज्य संस्थापनेची संधी उपलब्ध करून दिली . आणि स्वतः कर्नाटकात राहून स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी सक्रीय मदत केली आणि मार्गदर्शन ही केले . त्यासाठी शहाजी राजांना एक वेळा बडतर्फ आणि दोन वेळा आदिलशहाच्या कैदेत पडावे लागले . जिजामातेने वरील संकटातून आपल्या विरपुत्राच्या सहाय्याने आपल्या पतीची सहिसलामत सुटका केली . पती निधनानंतर सती न जाता आपल्या पतीची स्वतंत्र राज्य संस्थापनेची महत्वकांक्षा याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी स्वतःला स्वराज्य कार्यात गुंतवून घेतले . एकुण स्वतंत्र नेतृत्व करणारी , संकटाच्या वेळी शिवाजी राजांना धिर देणारी आणि मार्गदर्शन करणारी ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरोक्ष स्वराज्याचे प्रशासन चोखपणे सांभाळणारी ,शिवाजी राजे मोगलाच्या कैदेत असतांना आणि त्यांच्या जिवीताला धोका असतांना सुध्दा मोगलांकडून किल्ला जिंकून घेणारी जिजामातेच्या प्रेरणेमूळेच शिवाजी राजांनी धाडशी कृत्य करून यश संपादन केले . जिजामातेने आपल्या कुटूंबाप्रमाणेच गोरगरीबांचे संसार थाटले . जिजाऊंच्या पायाशी सर्व सुखे लोळत असतांना त्याचा सर्वसामान्यप्रमाणे उपभोग न घेता स्वराज्याला जिवापाड जपले . आपल्या पतीची स्वतंत्र राज्य स्थापनेची महत्वकांक्षा आपल्या पुत्राच्या माध्यमातून पूर्ण केली . जिजाऊ ह्या राजमाता होत्या त्याच बरोबर त्यांना लोकमाता राष्ट्रमाता म्हणून लोकांनी गौरविले यातच त्यांची थोरवी सामावलेली आहे . अशा या थोर आणि वंदनीय लोकमाता ,राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण ,चिंतन आणि अनुकरण आज आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे . जिजाऊ साहेबांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन आपण लोक कल्याणाच्या कार्यास नव्या जोमाने आणि उत्साहाने वाहून घेतले तर संकल्पीत जिजामाता जन्मोत्सवामूळे उद्दीष्ट साध्य होईल तसेच या राष्ट्रमातेच्या जन्मोत्सवामूळे देशकार्य साधले जाईल .जिजाऊंचे चरित्र राष्ट्रीय दृष्ट्रीने आदर्शवतथोर व्यक्तीच्या चरित्राचा अभ्यास करतांना त्यापासून बोध येण्याची आणि घटनांचे विश्लेषण करण्याची दृष्टी असल्याखेरीज असा अभ्यास उपयुक्त ठरणार नाही .विदयमान आणि भावी पिढीच्या हिताचा विचार करत अशा अभ्यासाने सत्य इतिहासाचे यथार्थ दर्शन घडून त्यापासून योग्य तो धडा शिकण्यास आणि ऐतिहासिक दृष्टी विकसित होण्यास मदत झाली पाहिजे या दृष्टीने जिजामातेंचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र आणि कार्य आदर्शवत आहे .मोठी माणसे ही परिस्थितीनुरूप निर्माण होतात अणि इतिहास घडवतात .अर्थात इतिहासाला विशिष्ठ दिशेने वळण लावण्याचे सामर्थ्य या मानवी घटकांमध्ये आढळून येते . या जिजामातेने आपल्या पराक्रमी पुत्राच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीचे केलेले कार्य इतके प्रचंड आहे की त्यापासून आजचा भारत ज्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्नशिल आहे त्याची सर्व शिकवणूक त्यांच्या चरित्रातूनच मिळते .शिवबाच्या हातून राष्ट्रउभारणीचे कार्य करून घेणारी प्रत्यक्ष कृतीशिल आणि मार्गदर्शक एक थोर राष्ट्रमाता ,लोकमाता ,राजमाता म्हणून आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो.आणि म्हणूनच मॉ जिजाऊ संपूर्ण विश्वाला अभिमानाची गोष्ट आहे .

'झाले बहू ,होतीलही बहू परंतू या सम हिच ' अशा या बहूआयामी स्वराज्यसंकल्प मॉ जिजाऊंन्ना त्यांच्या ४२२ व्या जन्मदिनी कोटी कोटी नमन .जय जिजाऊ ,जय शिवराय-शिवमती माधुरी भदाणेप्रदेश कार्याध्यक्ष ,जिजाऊ ब्रिगेड

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवNashikनाशिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज