रिक्षा प्रवासात पुन्हा दागिने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:33 AM2022-07-04T01:33:54+5:302022-07-04T01:34:21+5:30

रिक्षा प्रवासात दागिने गायब करणारी टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. नाशिक रोडनंतर आता अंबड ते रामवाडी या मार्गावर रिक्षा प्रवासात एका महिलेच्या पर्समधील सोनसाखळी सहप्रवासी अज्ञात दोघा महिलांनी लांबविल्याची घटना घडली.

Jewelry disappears again on rickshaw journey | रिक्षा प्रवासात पुन्हा दागिने गायब

रिक्षा प्रवासात पुन्हा दागिने गायब

Next

पंचवटी : रिक्षा प्रवासात दागिने गायब करणारी टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. नाशिक रोडनंतर आता अंबड ते रामवाडी या मार्गावर रिक्षा प्रवासात एका महिलेच्या पर्समधील सोनसाखळी सहप्रवासी अज्ञात दोघा महिलांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रामवाडीत राहणाऱ्या सरला विजय गांगुर्डे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बुधवारी (दि. २९) दुपारच्या सुमारास गांगुर्डे या अंबड ते पंचवटी असा रिक्षाने प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत रिक्षात बसलेल्या दोघा महिलांनी गांगुर्डे यांच्या पर्समधील दीड तोळे वजनाची ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पाचशे रुपये गायब केले.

गेल्या काही दिवसांपासून रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने व रोकड चोरीचे प्रकार वाढल्याने रिक्षाने प्रवास करणे महागात पडत आहे.

Web Title: Jewelry disappears again on rickshaw journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.