येवला : जऊळके येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हाजी गाजी बाबा यात्रोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन चतुर्थीला येथे यात्रा भरते. यात्रोत्सवानिमित्त संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोलताशाच्या गजरात गावातून मिरवणूक निघणार आहे. जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने परिसरातील स्त्री, पुरुष, तरुण वर्ग मोठ्या संख्येने यात्रोत्सवात सहभागी होतो. संदल मिरवणुकीत येथील दशरथ भड यांच्या घोड्याचे नृत्य सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोे. मिरवणुकीनंतर चादर चढवण्यात येणार आहे.रात्री बंडूनाना धुळेकर, सुनीताबाई धुळेकर यांचा लोकनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . सरपंच शालिनी वाळके, विठोबाजाधव, शांताराम सोनवणे, मल्हारी दराडे, भाऊराव जाधव, सुकदेव मोरे, भीमा भळसाणे, विठोबा सानप, अर्जुन सोनवणे, पोलीसपाटील प्रकाश सोनवणे, यात्रा कमिटी, ग्रामस्थ यात्रोत्सवासाठी प्रयत्नशील आहेत.
जऊळकेत हाजी गाजी बाबा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST