शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मतोबा महाराजांच्या जय घोषात यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 6:26 PM

निफाड : तालुक्यातील नैताळे येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास सोमवारी श्री मतोबा महाराजांच्या जय घोषात प्रारंभ झाला आहे

ठळक मुद्दे  श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट व श्री जगनराव कोपूलकर यांच्या वतीने आज हजारो भाविकांना मोतीचूर लाडूचा व रव्याचा प्रसाद देण्यात आला,

निफाड : तालुक्यातील नैताळे येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास सोमवारी श्री मतोबा महाराजांच्या जय घोषात प्रारंभ झाला आहेदरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पौष पौर्णिमेला श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. सकाळी ८ वाजता निफाडचे माजी आमदार दिलीप बनकर, प्रणव पवार, धनश्री पवार व निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, प्रिती पडिले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांची ‘महापूजा’ करण्यात आली, तर जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, जान्हवी कदम यांच्या हस्ते ‘रथपूजा’ करण्यात आली त्यानंतर मतोबा महाराज मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला ही मिरवणूक नैताळे गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य भारती पवार, संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, निफाड शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल कुंदे, लासलगाव बाजार समितीचे संचालक सुभाष कराड, वैकुंठ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल गाजरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, जि. प. सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, श्रीरामनगर सोसायटीचे अध्यक्ष भीमराज काळे, नाशिकरोडचे कास्मिरे बाबा, निफाडचे नगरसेवक देवदत्त कापसे, दिलीप कापसे वनसगावचे सरपंच उन्मेश डुंबरे, विलास मत्सागर निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, निफाड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, पोलीसपाटील आत्माराम बोरगुडे, मनीषा रोहिदास डावखर हे उपस्थित होते. श्री मतोबा महाराज देवस्थानच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केदुनाना बोरगुडे व विश्वस्त मंडळाने फेटा-शाल देऊन सत्कार केला या यात्रेत असंख्य दुकाने लावण्यात आली असून, पहिल्याच दिवशी असंख्य भाविकांनी मतोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. आमदार अनिल कदम यांनी दुपारी या यात्रेला भेट देऊन मतोबा महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले सालाबादप्रमाणे येवला तालुक्यातील जऊळके येथून आलेल्या तकतराव रथाची मिरवणूक दुपारी काढण्यात आली हाती