जन्या सिडकोत  बंद घराला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 00:39 IST2021-02-22T00:38:18+5:302021-02-22T00:39:03+5:30

जुने सिडको येथील शिवाजी चौकातील  मनपा कार्यालयामागे असलेल्या बंद घराला अचानकपणे आग लागली. बाल्कनीतून धुराचे लोट उठल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. 

Janya Sidkot closed house on fire | जन्या सिडकोत  बंद घराला आग 

जन्या सिडकोत  बंद घराला आग 

नाशिक : जुने सिडको येथील शिवाजी चौकातील  मनपा कार्यालयामागे असलेल्या बंद घराला अचानकपणे आग लागली. बाल्कनीतून धुराचे लोट उठल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. 
याठिकाणी राहणारे स्वप्निल पेठे हे कुटुंबासमवेत घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अग्निशमन दलाने  आग विझविली आणि पेट घेतलेले गॅस सिलिंडर घराबाहेर काढत ते सुरक्षित केले. या आगीमध्ये घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. 
घटनास्थळी फायरमन प्रमोद लहामगे, बाबा देशमुख, रवी आमले, सुनील शिलावट, मल्हारी अहिरे यांनी मदतकार्य करत अवघ्या काही मिनिटांतच आग विझविण्यास जवानांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Janya Sidkot closed house on fire