शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम समाजाकरिता ‘जनाजा’ रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:06 IST

जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीमबहुल भागातील मृतदेह जुन्या नाशकातील जहांगीर, रसूलबाग कब्रस्तानापर्यंत आणताना समाजबांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली.

ठळक मुद्देमहापालिकेकडून सुविधा : हिसामुद्दीन खतीब यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीमबहुल भागातील मृतदेह जुन्या नाशकातील जहांगीर, रसूलबाग कब्रस्तानापर्यंत आणताना समाजबांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होती. मनपाच्या वतीने दोन वाहने (जनाजा रथ) उपलब्ध करून देण्यात आली. या वाहनांचे शुक्र वारी नमाजनंतर जहांगीर कब्रस्तान प्रवेशद्वारावर लोकार्पण करण्यात आले. यावेळी शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी फातेहापठण करून विशेष दुवा मागितली.मुस्लीम समाजाकरिता वैकुंठ रथाच्या धर्तीवर ‘जनाजा रथ’ उपलब्ध व्हावेत, यासाठी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी पाठपुरावा करत महासभेत ठराव मांडला व महासभेने तो मंजूर करून घेतला. सुमारे ३५ ते ४० हजाररुपये खर्च करून महिंद्र कंपनीचे दोन लहान टेम्पो या प्रकाराची वाहने खरेदी करण्यात आली. या वाहनांची जनाजा रथ ठेवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रचना करून जनाजा वाहून नेण्यासाठी वाहन तयार केले. यामध्ये मृतदेहाचा जनाजा ठेवण्यासाठी मजबूत स्टँड बनविण्यात आला आहे. नातेवाइकांना उभे राहण्यासाठी व दफनविधी साहित्य ठेवण्यासाठी मुबलक जागा आहे. मुस्लीम समाजासाठी मोफत दफनविधी साहित्य मनपाकडून पुरविले जाते. जनाजा रथाची उणीव प्रकर्षाने जाणवत होती, म्हणून मनपा प्रशासनाकडे लोकप्रतिनिधी या नात्याने पाठपुरावा केला. महासभेत प्रस्ताव मांडला व त्याला मंजुरी मिळाल्याने समाजाची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली, असे सय्यद यावेळी म्हणाले. जहांगीर कब्रस्तानच्या प्रवेशद्वाराजवळ फातेहापठण होऊन जनाजा वाहनांचे लोकार्पण झाले. आज झालेल्या फातेहाखॉनीप्रसंगी शहर-ए-काझी मोईजोद्दीन सय्यद, एजाज काझी, गुलशने तैबा मशिदीचे नायब इमाम अब्दुल सलाम, रिजवान खान आदी मान्यवर उपस्थित होते.या उपनगरांना फायदाजुने नाशिक भागात मुस्लीम समाजाचे मोठे कब्रस्तान आहेत. त्यामुळे सातपूर, अंबड, नाशिकरोड, पंचवटी, वडाळागाव, अशोका मार्ग, पखालरोड, भारतनगर, भाभानगर, उपनगर, टाकळी आदी परिसरातील राहणाºया मुस्लीम समाजबांधवांना जनाजा रथांचा फायदा होणार आहे. राहत्या घरापासून कब्रस्तानापर्यंत दफनविधीकरिता नेण्यासाठी हे रथ उपयोगी ठरणार आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीम